कोल्हापूर घटनेनंतर यवतमाळ पोलीस अलर्ट मोडवर ;

0

सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष

(Yavatmal)यवतमाळ : कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेनंतर यवतमाळ जिल्हा पोलीस अलर्ट मोडवर आहेत.जिल्ह्यातील संवेदनशील पुसद , उमरखेड मध्ये यवतमाळ पोलिसांचा विशेष वॉच आहे.31 पोलीस ठाण्यात नाईट पेट्रोलीग शिवाय फूट पेट्रोलिंग वाढवण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन (Superintendent of Police Dr. Pawan Bansod)पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी केले आहे.