निलेश राणेंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

0

(Nagpur)नागपूर – (Former MP Nilesh Rane)माजी खासदार निलेश राणे यांनी  (NCP President Sharad Pawar)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात अपशब्द ट्विट केल्याने राष्ट्रवादीत संताप आहे. (Nagpur District NCP President Shivraj alias Baba Gujar)नागपूर जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष शिवराज उर्फ बाबा गुजर यांनी निलेश राणेंच्या कानाखाली वाजवा एक लाख रुपये मिळवा असे आवाहन केले आहे. निलेश राणेंनी म्हटले आहे की, निवडणुका आल्या की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त असतात असे वाटते की औरंगजेबाचा पुनर्जन्म झाला ,या विधानाचा महाराष्ट्रातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी निषेध करीत आहे.

नागपूर जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने पवार साहेब यांच्या विरोधात केलेल्या विधानाचा निषेध करून मिळेल तिथे निलेश राणेच्या कानाखाली जो वाजवेल त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. राणे परिवारातील वाचाळवीरांना त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लवकरच लगाम घालावा, अगोदरच राज्यातील परिस्थिती जातीय दंगलग्रस्त असताना जबाबदार व्यक्तींनी असे विधान करणे अतिशय चुकीचे आहे. आगीत तेल ओत ल्यासारखे काम हे वरिष्ठ नेते करीत आहेत जनतेला शांततेचे आवाहन करण्याचे सोडून मीडियात एक दुसऱ्यावर आरोप करण्याची स्पर्धा सुरु आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही याची दखल राणे कुटुंबीयांनी घ्यावी असा इशारा गुजर यांनी दिला आहे.