– घरातील विहिरीत आढळला मृतदेह
(Nagpur)नागपूर :- (Senior journalist Arun Phanshikar)ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा मृतदेह आज दुपारी त्यांच्याच गिरीपेठ परिसरातील घरातील विहिरीत आढळून आल्याने वृत्तपत्रसृष्टीत खळबळ उडाली. अतिशय मितभाषी असलेल्या अरुण फणशीकर यांनी आत्महत्येचे हे टोकाचे पाऊल का उचलले यासोबतच हा घातपात तर नाही ना अशीही शंका यानिमित्ताने उपस्थित केली जात आहे. पोलिसांना मात्र कुठलीही सुसाईड नोट सापडलेली नाही. 72 वर्षीय अरुण फणशीकर रोज मॉर्निंग वाकला जात होते आजही ते सकाळी निघाले मात्र घरी परत आले नाही. कुटुंबीयांनी बराच शोधाशोध केली. सोशल मीडियावरही ते बेपत्ता असल्याचे वृत्त झळकले मात्र दुपारी अडीचच्या सुमारास घरातील विहिरीतच त्यांचा मृतदेह आढळून आला. (The Hitvad)द हितवाद,(Indian Express) इंडियन एक्सप्रेस, (Hindustan Times)हिंदुस्थान टाइम्स अशा विविध वर्तमानपत्रात त्यांनी ज्येष्ठ पत्रकार म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या, त्यांच्या निधनाने वृत्तवृत्तसृष्टीतील अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.