Home NAGPUR NEWS जी.एस. कॉलेजच्या प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

जी.एस. कॉलेजच्या प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

नागपूर: नागपुरातील नावाजलेल्या जीएस कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ प्राध्यापकाने नरेंद्रनगर येथील निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गजानन कराळे (वय ४१) असे मृत प्राध्यापकाचे नाव असून त्यांनी कॉलेज प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. बेलतरोडी पोलिसांनी याप्रकरणी सुसाईड नोट हस्तगत केली आहे.
बेलतरोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराळे हे आज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांची पत्नी व मुलगा अमरावतीला गेले आहेत. या घटनेची माहिती त्यांना देण्यात आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी पत्नी व सहा वर्षाच्या मुलाची माफी मागत आपण त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकलो नसल्याची खंत व्यक्त केली आहे. कॉलेजकडून सुरु असलेल्या प्रशासकीय चौकशीतून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कराळे यांनी त्यांच्या आत्महत्येसाठी कॉलेजमधील पाच ते सहा फॅकल्टी मेंबर्सची नावे नमूद केली असून पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसीएच) पाठवला आहे.