गुलाबराव पाटील दगड!

0

पाचोऱ्यातील सभेपूर्वी संजय राऊत यांचे टीकास्त्र : ४०० कोटींच्या भ्रष्टाचाराचाही आरोप

जळगाव. जळगाव ही सूवर्ण नगरी (Jalgaon is a golden city ) आहे. येथील काही दगडं आमच्याकडे सोने म्हणून होते. पण, ते दगडच निघाले. इथे गुलाबो गँग (gulabo gang ) आहे. ५०-५० कोटीं घेऊन त्यांनी शिवसेना (Shiv Sena ) सोडली. हे लोकं शिवसेनेच्या मेहेरबानीने शिवसैनिकांची मतं घेऊन निवडून आली आहेत. त्यानंतर ते विकले गेले. आता तेच आम्हाला धमक्या देत आहेत. आता ते आमच्या राजिनाम्याची मागणी करातत. पण, प्रथम ते शिवसैनिकांच्या मतामुळे निवडूण आले हे ध्यानात ठेवावे, असे घनाघाती टीकास्त्र खासदार संजय राऊत यांनी जागले. आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्री दादा भुसे आणि आमदार राहुल कुल यांच्यानंतर आता संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर ४०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. सभेत सांभाळून बोलण्याची अन्यथा सभेच शिरण्याची भाषा गुलाबराव पाटील यांनी केली होती. पण, सभेपूर्वीच राऊत यांनी टीका करीत कुणालाही घाबरत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणतात की ते गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. मात्र, त्यांची नेमकी कोणती अडचण झाली आहे? आज राज्याच्या मंत्रीमंडळातील भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार मोकळ आहेत. ते फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचारी, घोटाळेबाज आणि गुंडांची टोळी चालवत आहेत का? अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईला गेल्यावर गुलाबराव पाटलांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे उपमुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. यापूर्वी दादा भूसे, राहुल कुल यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे त्यांना पाठवली होती. त्यांना यासंदर्भात १० वेळा पत्रही लिहिली. मग फडणवीस नेमके काय करत आहेत? कोणाला टोप्या लावत आहेत? असेही ते म्हणाले. राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर करोना काळात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला. करोना काळात पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चढ्या भावात वस्तूंची खरेदी केली होती. यामध्ये ऑक्सिजन व्हेंटीलेटर्सचाही समावेश होता. त्यावेळी दोन लाखांचे व्हेंटीलेटर १५ लाखांना खरेदी केले गेले. महत्त्वाचे म्हणजे या भ्रष्टाचारावर त्याच गॅंगचे सदस्य चिमनराव पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केले होते. हा घोटाळा साधारण ४०० कोटी रुपयांचा आहे. मात्र, हे प्रकरण दाबलं जात आहे, असे ते म्हणाले.