Devendra Fadnavis “जमिनीत तोंड काळे केले नसते तर ते परिवारात असते..”, फडणवीस यांचा खडसेंवर पलटवार

0

जळगाव jalgaon : राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP  नेते एकनाथ खडसेंना EKNATH KHADSE आता नवा मालक मिळाल्यानं ते नव्या मालकांनी सांगितले तसे करतात. जमीनीच्या घोटाळ्यात त्यांनी तोंड काळे केले नसते तर त्यांच्यावर काळे झेंडे दाखविण्याची वेळच आली नसती, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंवर तोप (DCM Devendra Fadnavis on Eknath Khadse) डागली. आम्ही काळ्या झेंड्यांना घाबरणारे नाही. तोंड काळे केले नसते तर त्यांना नव्या मालकाकडे जावे लागले नसते. त्यांना आपल्या परिवारात राहता आले असते, असेही फडणवीस म्हणाले.”Had the face not been blackened in the ground, it would have been in the family.”, Fadnavis hit back at Khadse 

फडणवीस यांना जळगाव दौऱ्यात काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याचा इशारा खडसेंनी दिलाय. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी खडसेंचा समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, आम्ही जनतेची लोक आहोत आणि जनतेसाठी काम करीत आहोत. जळगावची जनता आमच्या सोबत आहे. विरोधकांचे घोटाळे बाहेर निघत असल्याने सारे एकत्र आले असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, त्यांच्यावर कारवाई होत असल्याने ते एकत्रित आलेले आहेत. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो असे कुणीही सांगत नाही. कारण भाजप सरकारने देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे केलेली आहेत, असेही ते म्हणाले.