हनुमानजी दुष्टांचा तर भाजप भ्रष्टाचार नष्ट करते-पंतप्रधान मोदी

0

नवी दिल्ली : भारतीय (bjp)जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय विरोधकांचा समाचार घेतला. हनुमानजी दुष्टांचा नाश करतात आणि भाजप भ्रष्टाचार नष्ट करते, असे नमूद करून मोदी यांनी विरोधकांना एक प्रकारे इशारा (PM Narendra Modi On BJP Foundation day) दिला.’सर्व पक्ष(Allparties) घराणेशाही, (corruption)भ्रष्टाचारात बुडाले आहेत. २०१४ मध्ये जे घडले, ते केवळ सत्तापरिवर्तन नव्हते. तर भारतातील जनतेने देशाच्या नवजागरणाची आणि नव्या प्रवासाची केलेली सुरुवात होती. १९४७ मध्ये इंग्रज निघून गेले असले तरी जनतेला गुलाम बनवण्याची मानसिकता येथे काही लोकांच्या मनात उरली आहे. या लोकांच्या साम्राज्यवादी मानसिकतेने देशातील जनतेला नेहमीच आपले गुलाम मानले. २०१४ मध्ये दलित, शोषित वंचित वर्गानं त्यांच्या विरोधात आवाज उठवला, असे मोदी म्हणाले.

 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही न्यायाने वागतो. पण, या लोकांना ते पचवता येत नाही. त्यांची भ्रष्ट कृत्ये उघड होत असल्याचे पाहून हे लोक निराश होऊन कटकारस्थान रचत आहेत. आता ते मोदी तुमची कबर खोदतील, अशी उघड धमकी देऊ लागले आहेत. पण, देशातील गरीब, महिला, मागासलेले, वंचित सर्व भाजपची ढाल बनून उभे आहेत. साम्राज्यवादी (imperialist)मानसिकतेच्या लोकांना याची कल्पना नाही. हनुमानजींच्या संपूर्ण जीवनावर नजर टाकल्यास, प्रत्येक प्रकारच्या यशात त्यांची (can do)‘कॅन डू’ ही वृत्ती आणि दृढनिश्चय खूप मोठी भूमिका बजावते. जगात कोणते काम अवघड आहे, जे तुमच्याकडून होत नाही? हनुमान करू शकत नाही, असे कोणतेही काम नाही. लक्ष्मण संकटात असताना हनुमानाने संजीवनी पर्वत आणला. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी(bjp) भाजपकडूनही असे प्रयत्न केले जात आहेत, यापुढेही करत राहतील. “राम काज किन्हें बिनु मोहि कहां विश्राम”, असेही मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

 

 

श्रीखंड आणि चक्का सॅन्डविच |How To Make Shrikhand | Chakka Sandwich Recipe |EP- 107 |

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा