स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये, चंद्रकांत पाटील यांचे संकेत

0

मुंबई: राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात, असे संकेत भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (Higher & Technical Education Minister Chandrakant Patil) पाटील यांनी दिले आहेत. (obc)ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरुन सध्या (Municipal election) महानगरपालिका निवडणुकांचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. यासंबंधीचे कायदेशीर समस्या मे महिन्यापर्यंत निकालात निघू शकतात. सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रकरणाबाबत निर्णय दिला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील मार्ग मोकळा होईल. त्यानंतर पावसाळ्यात प्रभाग रचना आणि इतर प्रक्रिया पार पाडून ऑक्टोबर महिन्यात (Municipal election)महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात, असे पाटील म्हणाले.

मुंबई, ठाणे, औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत उलटून गेल्यामुळे त्या विसर्जित झाल्या आहेत. त्यामुळे या महानगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरु आहे. करोनाच्या साथीनंतर २०१९ पासून राज्यातील अनेक(Municipal election) महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यामध्ये (mumbai)मुंबई महानगरपालिकेसह, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा समावेश आहे. या सर्व महानगरपालिकांमधील सभागृह विसर्जित झाल्यामुळे सध्या या सर्व ठिकाणी प्रशासकांमार्फत कारभार चालवला जात आहे.

 

 

श्रीखंड आणि चक्का सॅन्डविच |How To Make Shrikhand | Chakka Sandwich Recipe |EP- 107 |