नवी दिल्ली : (new delhi)पुढील काही दशके तरी (congress)काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता नाही, असे भाकित काँग्रेसमधून बाहेर पडून नवा पक्ष स्थापन करणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी वर्तविले आहे. आझाद म्हणाले की, “ मी काँग्रेसशी एकनिष्ठ राहून अनेक वर्षे काम केले. तरीही पक्षाने माझ्याबाबत फारशी सहानुभूती दाखवली नाही. मी सात वर्षे राज्यसभेत विरोधी पक्षाचा नेता होतो. या काळात मी(pm) पंतप्रधान (modi)मोदींच्या विरोधात अनेक भाषणे दिली. पण त्यांनी माझ्यावर राग धरला नाही. एका मुत्सद्दी नेत्याप्रमाणे ते वागले आहेत. ते दिलदार (mns)मनाचे नेते वाटतात”, असे आझाद म्हणाले. काँग्रेस आगामी काही दशके तरी पुन्हा सत्तेत येणार नाही, असेही ते म्हणाले.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आझाद यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. आझाद यांनी माजी पंतप्रधान (Atal Bihari Vajpayee)अटल बिहारी वाजपेयी यांचेही कौतुक केले. ते म्हणाले, वाजपेयी देशातील मोठ्या नेत्यांपैकी एक होते. मला आठवतेय संजय गांधी यांचे शेवटचे भाषण झाल्यानंतर त्यांनी त्या भाषणाची स्तुती केली होती.(Sanjay Gandhi) संजय गांधी यांनी अर्थसंकल्पावर भाषण देत असताना वाजेपयींवर जोरदार टीका केली. पण तरीही वाजपेयी यांनी संजय गांधी यांच्या टीकेला एकाही शब्दाने प्रत्युत्तर दिले नव्हते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
काँग्रेस नेते (rahul gandhi)राहुल गांधी यांच्या जवळचे लोक त्यांचे विरोधक आहेत आणि त्यांनी जे केले त्यामुळे आज त्यांना शिक्षा झाली आहे, याकडे लक्ष वेधून आझाद म्हणाले की, सर्व गांधींनी माफी मागितली आहे, इंदिरा गांधींनीही माफी मागितली आहे. अगदी महात्मा गांधीही खूप उदारमतवादी होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.