आदित्यचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा मी शाखाप्रमुख होतो” : मुख्यमंत्री

0

मुंबई :(mumbai) लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही उभा राहून निवडणूक लढवायचा अधिकार आहे. निवडून कोणाला द्यायचे, हे जनता ठरवित असते. मला त्यावर बोलण्याची गरज वाटत नाही. बोलणाऱ्याचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde on Aditya Thackeray) आदित्य ठाकरें च्या वक्तव्याचा समाचार घेतला. शिंदे म्हणाले की, आदित्य ठाकरेचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून काम करतो आहे. तोंडात सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांना मी काय बोलणार? असा टोलाही त्यांनी लगावला.
बुधवारी ठाण्यातील जाहीरसभेत (Aditya Thackeray)आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेवर शरसंधान साधले होते. एकनाथ शिंदे यांचा पक्ष नाही, तर ही चोरांची टोळी आहे. महाराष्ट्रात(maharashtra) गुजरातचे मुख्यमंत्री बसले आहेत, अशी टीका त्यांनी(Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीच्या जाहीरसभेत केली होती. मी (thane)ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार, असे खुले आव्हानही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यांच्या या आव्हानाला आता एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना उभी करण्यात माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. घरा-दारावर तुळशीपत्र ठेवले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

श्रीखंड आणि चक्का सॅन्डविच |How To Make Shrikhand | Chakka Sandwich Recipe |EP- 107 |