अमरावती : उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार उध्दव ठाकरे यांना सोडावा लागला.
सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे नाटक करीत आहेत. मात्र,
अकेला देवेंद्र फडवणीस सर्वांवर भारी आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्ते नाही आणि कोणीच नाही.
त्यामुळे वैफल्याच्या भावनेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेवर ते टीका करीत आहेत.
राहुल गांधी ‘गंदगी’ दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर राज्यभरात भाजपतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. अमरावतीच्या बडनेरा परिसरात ही यात्रा निघाली असता भाजप नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर पातळी सोडून सडकून टीका केली., यावेळी अनिल बोंडे यांची जीभ घसरली. राहुल गांधी सावरकर नाहीत तर राहुल गांधी हा राहुल गांधीही नाही तर राहुल गांधी हा राहुल गंदगी आहे अश्या शब्दात पातळी सोडून खासदार अनिल बोंडे यांनी टीका केली आहे. ज्यांच्या डोक्यात, मनात तेवढी गंदगी तोच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करू शकतो तो म्हणजे राहुल गंदगी आहे अशी टीका अनिल बोंडे यांनी केली आहे. गाढवाला गुळाची चव नसते म्हणून एक नाही,दोन नाही,तीन वेळा स्वतंत्रवीर सावरकर यांचा अपमान राहुल गांधी करत आहे असं म्हणत बोंडे यांनी राहुल गांधींना गाढवांची उपमा दिली.