कोल्हापूर : जादू ही नेहमी बाळासाहेब ठाकरे यांची असते. बाळासाहेब यांच्या जादूपासून दूर गेलं की काय होतं? त्याचा अनुभव सध्या येत असून उद्धव ठाकरें यांचेकडे आता फक्त उबाठा हेच नाव राहिलं असल्याची टीका ना
दीपक केसरकर यांनी केली आहे.
कालचा जो मेळावा झाला त्याच्या जाहिरातीवरून बाळासाहेब यांचे नाव गायब होते. दोन्ही काँग्रेसचा प्रयत्न राहिला आहे की बाळासाहेब यांची जादू नाहीशी करायची. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. कारण शिंदे साहेब यांनी उठाव केला आणि बाळासाहेब यांचं नाव कायम ठेवलं.
नाहीतर उबाठा हेच नाव राहिलं असतं शिवसेनेच. आता त्यांच्याकडे केवळ उबाठा हे नाव राहिले आहे. अजूनही उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, सावरकरांच्या, बाळासाहेब यांच्या विचाराबरोबर यावे. केवळ स्टेजवरून इशारे न देता सावरकर यांना बोलणाऱ्या काँग्रेसपासून दूर जाऊन उत्तर द्यावं इतकीच अपेक्षा. ज्योतिबाचा आशीर्वाद कायमच कोल्हापूरला राहिला आहे.