नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटाचा अंदाज

0

 

भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये दिनांक १७ ते २१ जुलै २०२३ या कालावधीत वादळीवारा, वीज व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून या कालावधी करिता येलो अलर्ट जारी केला आहे, तथापि १८ जुलै २०२३ करिता Orange Alert दिलेला असून या दिवशी काही ठिकाणी जोरदार ते खूप मुसळधार स्वरूपाच्या पावसासह वादळीवारा व वीज गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक असून चुकून सुद्धा झाडा खाली उभे राहू नये. नदी व नाल्याच्या पुलावरून जर पाणी वाहत असेल तर धाडस करून कुठल्याही प्रकारे पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, नदी, तलाव व धरणे या ठिकाणी नागरिकांनी विशेष: युवकांनी पाण्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नये, जिल्ह्यातील समस्त नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.