अमरावती- अमरावती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी एकूण 2 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या 2 कोटी मधून 50 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी खासदार नवनीत राणांनी दिल्यामुळे हा निधी वापरण्यास काही आंबेडकरी संघटनांनी विरोध केला आहे, यात रिपाइंचे गवई गटाचे नेते राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषद घेत यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. 23 तारखेला अमरावतीत त्यांनी सर्व विरोध व समर्थन करणाऱ्या आंबेडकरी संघटनांची बैठक आयोजित केली आहे. बसून यावर तोडगा काढू असे यासंदर्भात राजेंद्र गवई म्हणाले . सर्वांची सहमती असेल तरच भूमिपूजन करू व नवनीत राणा यांनी लोकप्रतिनिधी म्हणून दिलेला निधी वापरा नाही तर तो वापस जाईल व याला विरोध करू नका असे आवाहन रिपाइंचे या तर सर्वांची सहमती असेल तरच भूमिपूजन करू व नवनीत राणा यांनी लोकप्रतिनिधी म्हणून दिलेला निधी वापरा नाही तर तो वापस जाईल व याला विरोध करू नका असं आवाहन रिपाइंचे सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी केले आहे.