नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 12 मान्यवरांचा समावेश आहे. प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन यांना कला क्षेत्रातून यंदाचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर त्यानंतर कुमार मंगलम बिर्ला (व्यापार आणि उद्योग), सुमन कल्याणपूर (कला), दिपक धर (विज्ञान आणि अभियांत्रिकी) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. (Padma Awardees from 2023 from Maharashtra) महाराष्ट्रातील पद्मश्री मानकरींमध्ये भिकुजी रामजी इदाते (समाजसेवा), राकेश झुनझुनवाला -मरणोत्तर (व्यापार आणि उद्योग), गडचिरोलीचे झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणे (कला), लोकसाहित्यिक डॉ प्रभाकर भानुदास मांडे (साहित्य आणि शिक्षण), गजानन माने (समाजसेवा), रमेश पतंगे (साहित्य आणि शिक्षण), रवीना टंडन (कला), कुमी नरिमन वाडिया (कला) यांचा समावेश आहे.
सन २०२३ साठी एकूण १०६ पद्म पुरस्कार जाहीर झाले असून त्यात ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण व ९१ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यामध्ये १९ महिलांचा समावेश असून ७ मरणोत्तर व २ परदेशी वा अनिवासी भारतीयांचा समावेश आहे.
विदर्भातील मानकरी परशुराम खुणे
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्कारांमध्ये पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंत परशुराम खुणे यांचा समावेश आहे. हा पुरस्कार माझा नाही तर झाडीपट्टी रंगभूमीचा असल्याचे मत परशुराम खुणे यांनी व्यक्त केले. कुरखेडा तालुक्याच्या गुरनुली गावातील डॉ. परशुराम खुणे गेल्या ४० वर्षांपासून झाडीपट्टीच्या रंगभूमीवर रसिकप्रिय विनोदी नट आहेत. आजपर्यंत झाडीपट्टीच्या रंगभूमीवर आठशेवर नाटकातून विविध भूमिका साकारल्या आहेत. विशेषत: ‘झाडीपट्टीतील दादा कोंडके’ अशीही त्यांची ख्याती आहे.
पद्मविभूषण चे इतर मानकरी
पद्म पुरस्कारांमध्ये सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पद्भविभुषणच्या इतर मानकऱ्यांमध्ये कर्नाटकचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा, सपा नेते मुलायमसिंह यादव, आर्किटेक्ट बाळकृष्ण दोशी, औषध निर्माते दिलीप महालनबीस यांचा समावेश आहे.
पनीर चिंगारी आणि ब्रेड पकोडा Ep.no 77 | Paneer Chingari & Bread Pakoda | Shankhnaad khadyayatra