दिल्ली. भारतात (India) प्रजासत्ताक दिन (Republic Day ) म्हणजेच २६ जानेवारी आणि स्वातंत्र्य दिन (Independence Day ) १५ ऑगस्ट या दोन खास दिवशी तिरंगा फडकवला जातो. या दोन्ही दिवशी लाल किल्यावर ध्वजारोहण केले जाते. १५ ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते. गेली आठ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी ध्वजारोहण करताना दिसतात. पण, २६ जानेवारीला पंतप्रधानां ऐवजी राष्ट्रपती ध्वजवंदन करतात. ही बाब जवळपास सर्वांनाच माहिती असेल. पण, या दोन सोहळ्यांमध्ये हा काही एकच फरक नसतो. तर दोन्ही सोहळ्यांमध्ये लक्षणीय अंतर (Significant differences between the two ceremonies ) असते. दोन सोहळ्यांमधील फरक आणि करण आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा संविधान नसल्याने भारताचे प्रमुख पंतप्रधान होते. या दिवशी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून प्रथमच ध्वजारोहण केले. तेव्हापासून १५ ऑगस्टला पंतप्रधान नेहमी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. त्यावेळी लालकिल्यावर ब्रिटिकांचा झेंडा अर्थात युनीयन जॅक होता. भारत आता स्वतंत्र देश आहे, हे दर्शविण्यासाठी त्यावेळी युनीयन जॅक खाली उतरवून तिरंगा ध्वज तळापासून वर खेचून फडकविला गेला होता. स्वातंत्र्यदिनी तिच प्रथा आजही कायम आहे.
राज्यघटना अस्तित्वात येताच त्यात सूचविल्याप्रमाणे त्याच दिवशी अर्थात २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती बनले होते आणि राष्ट्रपतींना देशाचा प्रथम नागरिक मानले जाते. त्यामुळेच तेव्हापासून आजपर्यंत २६ जानेवारीला राष्ट्रपती तिरंगा फडकवतात. पण, त्यावेळी तिरंगा ध्वज पहिलेपासूनच अस्तित्वात होता. यामुळे तो उंचावर बांधला गेला. केवळ तो उघडून फडकविला गेला. त्या दिवसापासून पुढे प्रत्येक प्रजासत्ताक दिली अशाच पद्धतीने असलेल्या ध्वजवंदन केले जाते.
२६ जानेवारीला परेड
भारत यावेळी ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. हा दिवस २६ जानेवारी १९५० रोजी लागू केलेल्या भारतीय संविधानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. १९५० च्या संविधानाने, देश अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक म्हणून ओळखला जाऊ लागला. या दिवशी संविधान प्रमुख राष्ट्रपती यावेळी ध्वजारोहण करतात. राजधानी दिल्लीत एक विशाल परेड आयोजित केली जाते. त्यातून भारताकडून आपल्या सामरिक सामर्थ्याचे प्रदर्शन जगासमोर केले जाते. आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत भारताने लष्करासाठी आवश्यक शस्त्रसुद्धा देशातच तयार करण्यावर भर दिला आहे. त्यातून अनेक उपकरणे, शस्त्रास्त्र तयार झाली आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये त्यांचा सहभाग करून घेण्यात आलेला दिसला.