नागपूर : हा महाराष्ट्र आणि देश प्रत्येक माणसाचा आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ते शिवसेना पक्षप्रमुख आहेत. कुठलाही मतदारसंघ हा कोणाची जहागीर नाही. शिवसेनेचा मतदार संघ असल्याने या ठिकाणी शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे जात आहेत. पंतप्रधान म्हणून अमरावतीत पोस्टर लागले आहेत त्याकडे लक्ष वेधले असता कुठलेही पोस्टर हे कार्यकर्ते उत्साहात लावत असतात. भविष्यात कोण काय होईल हे सांगताच येत नाही. हिंदुत्व आणि शिवसेना हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व हे तळागाळातील मनात रुजलेले आहे. ह्या बाबतीत शिवसेनेला ढोंगीपणा करण्याची गरज नाही शेवटी कोण कशा पद्धतीने हिंदुत्वाचा वापर करतो हे जनतेला माहित आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच होते आणि येणाऱ्या काळातही दुसरे कोणी हिंदुहृदयसम्राट होऊ शकणार नाही.
आम्हाला हिंदुत्व प्रोजेक्ट करायला वेगळे काही करण्याची गरज नाही यावर दानवे यांनी भर दिला.