सक्करदरा चौकात भीषण अपघात,तरुण-तरुणी गंभीर -सिग्नल तोडत पिकअप व्हॅनची धडक

0

नागपूर :सक्करदरा चौकातील सिग्नलवर उभ्या असलेल्या दोन दुचाकीस्वारांना एका पिकअप वाहन चालकाने सिग्नल तोडून जबर धडक दिली. दोन्ही वाहने गाडीखाली गेल्याने दोघांनाही गंभीर दुखापत झाली. सक्करदरा चौकातील वाहतूक सिग्नल सुरू झाल्यावर दुचाकीस्वार दोघे पुढे निघाले त्याचवेळी भांडे प्लॉट चौकातून रेशीमबाग चौकाच्या दिशेने जाणारी बोलेरो एमएच ४० – वाय ४५७३ ही पिकअप गाड़ी भरधाव वेगात आली . सिग्नल तोडत चालकाने या तरुणीला आधी धडक दिली. त्यानंतर दीपकच्या दुचाकीला चिरडले यात दोघेही गंभीर जखमी झाले अपघातानंतर चालक गाडी सोडून पळून गेला . घटनास्थळावर नागरिक जमा झाले व त्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले , नंबरप्लेटच्या आधारे पोलिसांनी गाडीच्या मालकाशी संपर्क साधला असता त्याने भांडे प्लॉट चौकातील कमलेश तिवारी या ऑटोडीलरला गाडी विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तिवारीच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली असता , गाडी कर्मचारी 21 वर्षीय करण चौधरी रा.कुही हा घेऊन गेल्याचे कळले. पोलिसांनी चौकशीअंती करणला अटक केली. जानव्ही विनोद चौधरी, दीपक उईके अशी जखमींची नावे आहेत. आधी या दोघांना खासगी रुग्णालयात आणि नंतर त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा