नागपुरात अचानक थंडी बेपत्ता

0

नागपूर :नागपुरात गेल्या दोन दिवसात अचानक थंडी बेपत्ता झाली आहे. 10 ते 12 डिसेंबर दरम्यान नागपूर, विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर पावसाचे सावट होते. मात्र, पावसाच्या रिमझिम सरी वगळता पावसाने दिलासा दिला. या निमित्ताने ढगाळ वातावरण असल्याने थंडी बेपत्ता झाली आहे. तापमान जवळपास दहा अंशाने वाढले असल्याने ऊनी कपडेही विश्रांती घेत आहेत. तापमान वाढल्याने हिवाळा की उन्हाळा असा संभ्रम आहे. वर्धा येथे मंगळवारी विदर्भातील सर्वाधिक 22.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली तर नागपुरात 21.4 अंश तापमान होते. अकोला येथे सर्वाधिक 31.8 अंश तापमान होते. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी लागत आहे. विदर्भात सुद्धा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अद्याप पाऊस झाला नसला तरी ढगाळ वातावरण यामुळे तापमानात वाढ झाली आहे. काही दिवस हीच स्थिती राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे .

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा