मुंबई : आधीही शिवसेनेतच होते आणि आता पुन्हा शिवसेनेतच प्रवेश केला आहे. २०१२ मध्ये शिवसेनेत आले आणि अजूनही शिवसेनेतच आहे. पक्षाने मोठी जबाबदारी दिली.शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सचिव केले आहे असे प्रतिपादन शिवसेना सचिव मनीषा कायंदे यांनी केले. महिलांना मुख्यप्रवाहात आणलं पाहिजे. ही एक चांगली सुरुवात आहे.
मुख्यमंत्री हे मंत्रालयात असले पाहिजे, ते फिरले पाहिजेत. गेल्या सरकारमध्ये दुर्दैवाने कोरोनाचं संकट आलं परंतु त्या वेळी अधिक ऍक्टिव्हिटी वाढली असती तर, लोकांना समाधान वाटलं असतं.आता पुन्हा सगळ्याच गोष्टी रुळावर आल्या आहेत. येणाऱ्या सर्वच निवडणुकीत पक्षाची जी काही जवाबदारी असेल ती मी स्वीकारणार. माझ्यानंतर ठाकरे गटात प्रियांका चतुर्वेदी आल्या आणि त्यांना खासदार केलं याचा आनंद वाटला. दुसऱ्या पक्षातून आलेल्या महिलांना मानसन्मान दिला जातो. ज्या महिलेने बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्या, वारकऱ्यांवर , देवीदेवतांवर ज्या पद्धतीने टीका केल्या. पक्षाचा डी.एन.ए बदलवला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची ठिकठिकाणी बेअब्रु व्हायला लागली ते मला आवडलं नाही. कोणीही काही म्हणालं तरी मी कोणाला उत्तर देणार नाही. मी विधानपरिषदेत आदित्य ठाकरे यांच्यासाठी छातीचा कोट करुन भांडले. जेव्हा नवनीत राणा, कंगना रनावत हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत होत्या तेव्हा आम्हीच ठामपणे उभे राहिलो. प्रत्येक पक्षात नवीन लोक येणारच. आपल्यानंतरही अनेक लोक येतील.निलम गोऱ्हे यांनी मला सांभाळुन घेतलं. आम्ही कधीही मत्सर केला नाही आणि आज ही करत नाही. सर्वच माझ्यासाठी आदरणीय आहेत.
पक्षाची बदनामी उघड्या डोळ्यांनी कशी बघायची ? संजय राऊत आपल्या सहकाऱ्यांबद्दल चुकीचं बोलत असतील तर ते दुर्दैवी आहे असा सवाल त्यांनी केला.