तुरुंगवास काय होतो हे मी सव्वा दोन वर्ष भोगलो – छगन भुजबळ

0

 

गोंदिया (Gondia): वज्रमूठ सभेचे नियोजन करताना प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी बोलावं अशा प्रकारचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार दोन नेते बोलत असतात इतरांना त्यामध्ये बोलण्याची परवानगी नसते असे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ  (NCP Leader Chhagan Bhujbal)यांनी स्पष्ट केले.

ईडी चौकशीच्या दरम्यान अनिल देशमुख यांना कसाबला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले, त्याच ठिकाणी ठेवले होते यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, तुरुंगवास काय आहे हे मी सव्वा दोन वर्ष भोगला याची मला जाणीव आहे
भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील  (BJP Leader Radhakrushn Vikhe Patil)  यांनी आपल्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आहेत असे वक्तव्य केले यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, त्यांच्या मनातले मी काय सांगू शकणार त्यांच्या मनात काय आहे हे ते स्वतःच सांगतील.