मुख्यमंत्री माझ्याविरुद्ध लढायला तयार असतील तर मी राजीनामा देतो – आदित्य ठाकरे

0

 

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी वरळीतुन राजीनामा द्यावा आणि पुन्हा जी निवडून यावं असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे त्यावर, जर सुधीर मुनगंटीवार घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करत असतील तर मी आता माझा राजीनामा द्यायला तयार आहे असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. ठाकरे म्हणाले,नोटबंदी नंतर देशाच्या आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम होईल हे बघायला लागेल. रिझर्व्ह बँकेने यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपनेच आरोप केले आहेत ते आताच्या मुख्यमंत्र्यावर केले आहेत. खरेतर सुधीर मुनगंटीवार यांचं या सरकारमध्ये कोणीच ऐकत नाही. मुख्यमंत्र्यांना कारभार जमत नाही नुसता गोंधळ सुरु आहे. स्वत:चं पद कसं वाचवुन ठेवायचं हे एवढेच मुख्यमंत्र्यांना माहित आहे.या गद्दार सरकारच्या विरोधात सगळेच राजकीय पक्ष एकत्रित आले आहोत. जर कर्नाटकात ४० टक्के भ्रष्टाचारी सरकार असेल तर महाराष्ट्रात १०० टक्के भ्रष्टाचारी सरकार आहे. संपुर्ण राज्यात चिखल तयार केल्यानंतर आता नालेसफाई करणं काय गरजेच आहे ? असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.