– 4 जून पर्यंत VNIT मध्ये शानदार आयोजन
– सुप्रसिद्ध कलाकारांच्या कलांचा होणार संगम
नागपूर, 28 मे 2023
सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अमंग्स्ट यूथ ( SPIC MACAY ) च्या ८ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन
सोमवार, 29 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता आयसीसीआरचे संचालक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सेवासदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी, अमृता विद्यापीठ कोची चे संचालक डॉ कृष्ण कुमार, सिम्बॉईसीस चे संचालक डॉ समीर पिंगळे यांची उपस्थिती राहणार आहे.
आठवडाभर चालणाऱ्या या अधिवेशनात भारतातील तसेच भारताबाहेरील जवळपास १५०० पेक्षा अधिक स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात शास्त्रीय संगीत, नृत्याचे कार्यक्रम, लोककला, शिल्पकलेची कार्यशाळा , सिनेमा स्क्रीनिंग , हेरिटेज वॉक , श्रमदान , योग ( पहाटे ४ वाजता ) , भोजन यांचा समावेश आहे . अधिवेशनाचा आणखी एक उद्देश म्हणजे नविन पिढीला आपली संस्कृती , परंपरा यासंदर्भात जागरूक करणे , प्रभावित करणे आणि यासाठी त्यांना आश्रमसदृश्य वातावरण देणे हा आहे . हे अधिवेशन स्पिक मॅकेच्या मूळ उद्देशाला धरून आहे . प्रत्येक युवकाला भारतीय तसेच जागतिक परंपरेद्वारा प्रेरणा व रहस्यवादाचा अनुभव प्राप्त होतो . या ८ च्या आंतराष्ट्रीय अधिवेशनात , त्याच शालेय अथवा कॉलेजमधील विद्यार्थाना सहभागी होता येईल ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे . प्रवेश किंवा सहभागी त्याच शालेय अथवा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना होता येईल ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे हे रजिस्ट्रेशन निशुल्क आहे . सहभागी सदस्यास भोजन व निवास निशुल्क असणार आहे , जिथे त्यांना पूर्ण आठवडाभर रहायचे आहे . ही सोय स्पिकमकेद्वारे केली जाणार आहे . या आठवडाभर त्यांना भारतीय कला , परंपराच्या वैभवाचा अनुभव घेता येणार आहे .
…….
शिल्प कार्यशाळाचे आयोजन
कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा श्रीमाळी ( कथ्थक ) , स्वामी त्यागराज ( हथयोग ) , श्री दादी पद्मजी ( कठपुतली कला ) , श्री तारापद रजक ( पुरूलिया छाऊ ) , श्री मार्गीमधु ( कुडिअट्टम ) या कलाकारांचे मार्गदर्शन मिळणार आहे . या कार्यशाळांमध्ये कुचिपुडी व शत्रीय नृत्य तसेच पूर्व भारतातील विविध कलांचा परिचय मान्यवर कलाकारांद्वारे प्राप्त होणार आहे . सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेदरम्यान शिल्पगुरू रामस्वरूप जी शर्मा, पद्मश्री भानु भाई चित्र, पद्मश्री जयप्रकाश, शिल्पगुरू मोहम्मद यूसुफ खत्री, राष्ट्रीय पुरस्कार विजेता बृजवल्लभ उदयवाल यांच्या विविध कार्यशाळा होतील.
…….
सुप्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी
अधिवेशनात शेख महबुब सुभानी आणि कलिशाबी महबूब ( नादस्वरम् ) , विदुषी प्रभा अत्रे ( हिंदुस्तान गायन ) विदुषी अरूणा साईराम ( कर्नाटक गायन ) पंडित अजय चक्रवर्ती ( हिंदुस्तानी गायन ) , बेगम परवीन सुलताना ( हिंदुस्तानी गायन ) , श्री मुकुल शिवपुत्र ( हिंदुस्तानी गायन ) विद्वान उमयालपुर शिवारामन् ( मृदुंगम् ) , उस्ताद वसिफउद्दिन डागर ( धृपद ) , पंडित साजन मिश्रा ( हिंदुस्तानी गायन पंडित उल्हास कशाळकर ( हिंदुस्तानी गायन ) , श्रीमती अलरमेल वल्ली ( भरतनाट्यम् ), डॉ. एन राजन ( हिंदुस्थानी व्हायोलीन) ए. कन्याकुमारी ( कर्नाटक व्हायोलीन ) विद्वान लालगुडी जयरामन् आणि विदुषो विजयलक्ष्मी ( कर्नाटक व्हायोलीन ) , मार्गी मधु ( कुडिअड्डम् ) विदुषी विजयलक्ष्मी ( कर्नाटक व्हायोलीन ) , मार्गी मधु ( कुडीअट्टम ) विदुषी तीजनबाई ( पंडवानी ) वारसी बंधु ( कच्चाली ) , श्री प्रल्हाद सिंह टिपानीया ( कबीर गायन ) , श्री तारापद रजक (पुरुलिया छाऊ ) , डॉ . अलंकार सिंह ( गुरुवानी ) , श्री भास्कर कोगा कामथ ( गोम्बेडा ) , श्री दादी पदमजी ( मॉडर्न कठपुतली ) नागालॅन्ड वृंदगाधन दल आणि अदुर गोपालक्रिष्णन , तसेच श्री गिरीश कासारी ( सिनेमा ) आपली कला सादर करणार आहेत.
….…
पत्रकार परिषदेला SPIC MACAY अध्यक्ष राममोहन तिवारी, सुमन डुंगा, सुप्रीती, रवी सातफळे, डॉ निशा कुलकर्णी, Vnit इंचार्जे रजिस्ट्रार एस आर साठे, रश्मी उद्दणवाडीकर यांची उपस्थिती होती.