से नी शिक्षकांचे समस्यांची शासनाने घेतली दखल

0

# उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाचा प्रभाव
# जून पासून होणार प्रलंबित समस्यांवर कारवाई शिक्षणाधिकारी यांचे सभेत आश्वासन
काटोल/नागपूर – सेवा निवृत्त मुख्याध्यापक ,शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पेन्शन, सातवे वेतन आयोग आदी महत्वाचे प्रलंबित समस्या बाबत विशेष सभा कै.खेडकर सभागृह जि प नागपूर येथे शिक्षणाधिकारी (प्राथ.) रोहीणी कुंभार यांचे उपस्थितीत पार पडली. यापूर्वी काटोल येथे नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे ज्वलंत समस्यांचे निवेदन दिल्याने त्याप्रश्नांबाबत शासना कडून त्वरित दखल घेतल्याने पीडित सर्व से. नि. कर्मचाऱ्याना दिलासा मिळाला आहे. नागपूरला जिल्ह्यातील से नि पदाधिकारी यांचे उपस्थितीत
खेडकर सभागृहातील विशेष सभेला सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी,सर्व शिक्षण अधिक्षक, संबंधित लिपीक आणि संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त उपस्थितीत विशेष सभा यशस्वी पार पडली. सभेत यापूर्वीचे दि १५ मे 2023 ला जि प मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा यांनी घेतलेल्या सभेतील सर्व मुद्यांचा आढावा घेण्यात आला.यात सातवे (7) वेतन आयोगाचे 1, 2 ‘3 हप्ते वितरण ‘अधिसंख्य प्रकरणे जि.प. आदर्श शिक्षक पुरस्कार वेतन वाढ,निवड श्रेणी ची रखडलेली प्रकरणे, तालुकास्तरीय तक्रार निवारण सभा, दि 18 मे ला सर्व प.स ला एप्रील चे पेन्शन अनुदान जाऊनही आजपर्यंत प स हिंगणा व नरखेड येथील से नि शिक्षकांचे पेन्शन का?झाले नाही. आदीसह निवडश्रेणी चे प्रस्ताव करण्याकरिता जि.प.स्तरावर तालुकावार शिबिराचे आयोजन करून तिथेच सेवा पुस्तके तपासणे आदी प्रश्नाबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला. यावर जुनपासून कार्यवाही करण्यात येईल असे मा शिक्षणाधिकारी यांनी आश्वासन दिले. संघटनेतर्फे जिल्हा सरचिटणीस दिपक सावळकर,मुख्य संघटक संजय भेंडे,जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव ठाकरे, राज्य प्रतिनिधी विनोद राऊत, सहसचीव जयदेव टाले आदींनी प्रभावीपणे समस्या मांडल्या . यावर मा. शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी दखल घेत सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी यांना गांभियाने कार्य करण्याबाबत सुचना दिल्या. सभेला संघटनेतर्फे जिल्हा कार्याध्यक्ष सरिता किंमतकर सचीव रामदास किटे, संघटन सचीव दिपक तिडके, महिला सचीव सुनिता दामले, सहसचीव अरुण बेंडे,रमेश बिरणवार, संघटक रामदास काकडे, जीवन डफरे, मधूकर फरतोडे,ज्ञानेश्वर वानखेडे, प्रभाकर लांजेवार,लक्षमण कडवे, प्रकाश वैरागडे, एकनाथ मांडवे,गुणीजन कडस्कर,वसंत लांडे, विलास येरखडे,पांडूरंग बूचे आदीसह जिल्हा व तालूका पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेतर्फे दिपक सावळकर यांनी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर सभेची सांगता झाली. से नि कर्मचाऱ्यांना दिलेली वागणूक व समस्या निराकरणाबाबत घेतलेली प्रशासकीय योग्य दखल याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.