नागपूर – अमरावती मार्गावर बाजारगाव येथे सोलर कंपनीत स्फोटाची ही घटना दुर्दैवी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः तिथे गेले आहेत. शासनाच्या वतीने मृत व्यक्तीच्या परिवाराला 5 लाख रुपये दिले जातील. जखमींचे उपचार सरकार करेल आणि या घटनेची चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मराठा बैठक संदर्भात बोलताना नागपूरला होतो परंतु ठाण्यात राम मंदिर अक्षता यात्रा निघत आहे आणि म्हणून मी सकाळी आलो. विश्व हिंदू परिषदसह बाळासाहेबांची शिवसेना उत्साहाने जल्लोषात या यात्रेमध्ये सहभागी झाली. अयोध्या हा विषय आमची अस्मिता श्रद्धा आणि देशाच्या अभिमानाची गोष्ट आहे. अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावे ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती.
जेव्हा ठाण्यामध्ये यात्रा आली होती तेव्हा धर्मवीर आनंद दिघे यांनी एक चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती.एकंदरीत ठाण्याचं आणि अयोध्येचं एक नातं आणि खरं म्हणजे हे तमाम लाखो,करोडो राम भक्तांचे स्वप्न होते, या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ते पूर्ण केलं.पहिले काही लोक म्हणायचे मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे पण मोदींनी मंदिरही बनवलं तारीखही सांगितली आणि उघाटन ही होतंय. मीरा-भाईंदर मधून तीनशे राम भक्त पायी चालत गेले .आज अक्षता वाटपाचा कार्यक्रम होत आहे. आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये घराघरांमध्ये या अक्षता पोहचल्या पाहिजेत. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होतंय आणि आपण सगळे राम भक्त या ठिकाणी दर्शनाचा लाभ आपल्याला मिळणार आहे असेही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.















