भंडारा, १७ डिसेंबर, : भंडारा शहरात राहणाऱ्या सरिता माकडे या महिला वकीलावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यामुळे वकिल संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात महिला वकिल सरिता माकडे या काम करत आहे. आरोपी महेश डोकरिमारे यांचा घटस्फोट कोर्टात सुरू आहे. त्यासाठी सरिता माकडे या त्यांच्या पत्नीची बाजू कोर्टात मांडत असून माझ्या विरूद्ध तू केस का लढत आहेस म्हणुन आज सकाळी आरोपी महेश यांनी चाकूने सरिता यांच्यावर प्राण घातक हल्ला चढविला. त्यात सरिता माकडे या जखमी झाल्या असुन त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. याचा निषेध करत आज जिल्ह्यातील वकील संघटनांनी विरोध दर्शवत आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















