नागपूर – नागपुरातील सोलार कंपनीमध्ये घडलेल्या घटनेत 9 लोक मृत्युमुखी पडले आहेत. जे लोक मेले त्यामध्ये 6 महिला आणि 3 पुरुष होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतकांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख मदत जाहीर केली आहे. आणखी अधिकाधिक मदत करण्याच्या आम्ही प्रयत्न करू, असे घटनास्थळी भेट दिल्यानंतर रामटेक मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाणे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.















