नागपूर (Nagpur): आयकर विभागाने शहरात ७ व्यक्तींशी संबंधित १० ठिकाणांवर छापे मारले आहेत. हवाला आणि बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर हे छापे घालण्यात आल्याची माहिती (IT Raids in Nagpur City) सूत्रांनी दिली. आयकर विभागाचे छापे पडलेल्या व्यावसायिकांमध्ये रवि अग्रवाल, लाला जैन, शैलेश लखोटिया, इज़राइल सेठ, तन्ना अशी नावे सांगण्यात येत असून आयकर विभागाकडून अद्याप कुठलाही दुजोरा मिळालेला नाही.
या कारवाईसाठी पहाटेच आयकर विभागाचे पथक नागपुरात दाखल झाले होते. सकाळी सात वाजल्यापासून ही कारवाई सुरु झाली. कंपन्यांमध्ये करविषयक आर्थिक अनियमितता व इतर कारणांपायी हे छापे पडल्याची माहिती आहे. यासंदर्भात अद्याप अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही.