अकोला- अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील रेडवा येथील सतीश बाळू भुयार, कमलाबाई बाळू भुयार आणि बार्शीटाकळी तालुका भूमि अभिलेख यांच्या विरोधात गावकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणारे सतीश बाळू भुयार व कमलाबाई बाळू भुयार यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि बार्शीटाकळी तहसील कार्यालयावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रेडवा येथील गावकऱ्यांनी उपोषणाची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत हा रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याचा इशाराही यावेळी आंदोलक गावाकऱ्यांनी दिला आहे.