“इंडियन मुजाहिदीनच्या नावातही ‘इंडिया’ आहे”, पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला

0

 

नवी दिल्ली- केवळ इंडिया हे नाव ठेवल्याने काही होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीमध्येही इंडिया होते आणि इंडियन मुजाहिद्दिनच्या नावातही इंडिया आहे, अशी टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विरोधकांच्या आघाडीवर केली.
मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, विरोधक विखुरलेले आणि हतबल झाले आहेत. त्यांना फार काळ सत्तेवर येण्याची इच्छा नाही, असे त्यांच्या वृत्तीवरून दिसत आहे. 2027 पर्यंत भारताला विकसित देश बनवणे आणि तिसऱ्या टर्ममध्ये भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे, हे आपले उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये त्यांनी १५ ऑगस्टला प्रत्येक घरी राष्ट्रध्वज लावण्याच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. देशातील प्रत्येक विधानसभेतून मातीने भरलेला अमृत कलश दिल्लीत आणून अमृतवन दिल्लीत उभारले जाईल, असे देखील त्यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशन काळातील ही संसदीय पक्षाची पहिलीच बैठक होती.