नागपूर-महानुभाव पंथातील आध्यात्माचा परिस्पर्श लाभलेले वाठोडा शुक्लेश्वर येथील श्री महंत वैद्यराज बाबा यक्षदेव यांचे २० जुलै रोजी नागपुरातील खासगी रुग्णालयात खाजगी देहावसान झाले. त्यांच्या देहावसानामुळे महानुभाव अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे. अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे शुक्रवारी सुश्रुशा करण्यात आली. ते वाठोडा शुक्लेश्वर येथील श्री दत्त मंदीर संस्थानचे संचालक म्हणून कार्य पाहत होते. अचलपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते.