भाजप-शिवसेनेतर्फे 3 एप्रिलला स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा -आमदार मदन येरावार यांची माहिती

0

यवतमाळ: स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात 30 मार्चपासून भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. यवतमाळ येथे ही यात्रा 3 एप्रिल रोजी निघणार असल्याची माहिती आमदार मदन येरावार यांनी दिली. गौरव यात्रेच्या माध्यमातून सावरकर यांच्या कार्याची ओळख सर्वसामान्यांना करून देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातून ही सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. यवतमाळ शहरात निघणाऱ्या यात्रेचा मार्ग दत्त चौक, नेताजी चौक, तहसील कार्यालय चौक, पाच कंदील चौक, अप्सरा टॉकीज चौक असा राहणार आहे. संतसेना चौकात गौरव यात्रेचा समारोप होणार आहे.