स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेची अंबादास दानवे यांच्याकडून पाहणी

0

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhajinagar)सिडको(CIDCO) येथील सात हेक्टर जागेमध्ये (Balasaheb Thackeray)बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे राहत आहे. याच मार्गाची आज विधान परिषद (Legislative Council)विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाहणी केली. 2017 मध्ये या स्मृतीवन आणि स्मारकास शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

अंदाजपत्रकानुसार 25.49 कोटी रुपये स्मारकासाठी देण्यात आले आहे. काम नियोजनानुसार सुरू असून लवकरच पूर्णतः केले जाईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. ज्याप्रमाणे नियोजन आहे त्याप्रमाणे काम हळूहळू प्रगतीपथावर आहे आणि यात आणखी काही सुचनांची गरज नाही असे देखील दानवे म्हणाले.

 

अंडा रेशमी पराठा आणि डेलगोना कॉफी | Egg Reshmi Paratha Recipe | Dalgona Coffee Recipe | Ep- 114 |