विदर्भ भावसार समाज अध्यक्षपदी अकोल्याचे अनिल मावळे

0

नागपूर- (Nagpur)अमरावती जवळच्या नांदगांव खंडेश्वर तालुक्यात प्राचीन हिंगलाज माता मंदिरात झालेल्या विदर्भ भावसार समाज संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अकोल्याचे अनिल गोपाळसा मावळे यांनी सुरेश लोखंडे यांचा सरळ सामन्यात पराभव केला. विजयी अनिल गोपाळसा मावळे यांच्यावर नागपूर, अमरावती, अकोला वाशिम चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ भंडारा, बुलडाणासह सर्व विदर्भातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोमवारी, 17 एप्रिलला (Amravati)अमरावती जिल्ह्यातील शिवकालीन मंदिर असलेल्या ज्वालामुखी हिंगलाज मंदिर (हिंगलाजपूर) येथे भावसार समाजाच्या अध्यक्षपदाची निवडणूक नियमानुसार पार पडली. 419 मतांपैकी 233 मते मावळे यांना प्राप्त झाली तर पराभूत उमेदवार सुरेश लोखंडे यांना फक्त आणि फक्त 184 मते मिळाली. 2 मते अवैध ठरली.

 

यावेळी विदर्भ (Vidarbha)भावसार समाजाचे महादेवराव साधनकर, धारव काकू (Maharashtra)महाराष्ट्र भावसार समाजाचे राजेशजी कळमकर, यवतमाळ येथील विष्णुपंत नघाटे,रितपरकर मंगरुळपीर येथील चंदूभाऊ परळीकर, अशोकभाऊ परळीकर, वाशिम येथील सुधाकरभाऊ परळीकर, नागपूर येथील मधुकर फुलझेले, मोरेश्वर कट्यारमल, अकोला येथील कृष्णराव नरडे, उमाकांतजी परळीकर, उज्वल वडे, बुलढाणा येथील अजय अहीर, सुभाष बाहेकर, प्रशांत खेते, अमरावती येथील सतीश वायचोळ, दिपक किडीले, महिला मंडळाच्या सर्व सदस्या सर्वश्री नितीन मुरलीधरसा ताकवाले यांनी उत्कृष्ट सहकार्य केले.

 

अंडा रेशमी पराठा आणि डेलगोना कॉफी | Egg Reshmi Paratha Recipe | Dalgona Coffee Recipe | Ep- 114 |