गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला

0

मुंबई : विरोधकांच्या निशाण्यावर असलेले उद्योगपती गौतम अदाणी यांनी आज गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट (Gautam Adani meet Sharad Pawar) घेतली. या दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली असून या दरम्यान नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील कळू शकलेला नाही. हिंडेनबर्ग अहवालावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गौतम अदानींवर जोरदार हल्लाबोल केला. या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली. तसेच या आरोपाची जेपीसीद्वारे चौकशी व्हावी यासाठी विरोधक आक्रमक आहेत. मात्र, शरद पवार यांनी वेगळी भूमिका घेत जेपीसी चौकशीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. पवारांनी अदानींचा बचावही केल्याने महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमध्ये या मुद्यावरून तणातणी सुरु आहे. आता काँग्रेसकडून अदानी-पवार भेटीवर या प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागलेले आहे.

 

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावरून राष्ट्रवादी वगळता सारेच विरोधक सरकारवर तुटून पडले आहेत. यावेळी (shard pawar)शरद पवार यांनी अदानींचा बचाव केला. हिंडेनबर्गच्या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित करताना पवारांनी जेपीसी चौकशीची मागणीही निरर्थक असल्याचे सांगितले होते. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेस व ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर गुरुवारी गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी होती, यावरुन तर्कवितर्क लढविले जात आहेत. दोन तास चाललेल्या या भेटीत अदानी यांनी पवारांकडे आपली बाजू मांडली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

नीर दोसा आणि आटेका दोसा | Neer Dosa Recipe | Atta Dosa Recipe | Ep-113 | Shankhnaad News |