सावध राहावे असा सल्ला आयपीएस अधिकाऱ्याने मला दिला – आ नितीन देशमुख यांची माहिती

0

अकोला – (Akola)अकोल्यात आमदार नितीन देशमुख (NItin Deshmukh)यांना आणण्यात आलेल्या पोलिसांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी अडविले. देशमुखांना पोलिस अधिक्षक कार्यलयात हजर केल्यानंतर त्यांना थोड्या वेळाने सोडून देण्यात आले.

दरम्यान आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे स्पष्ट केले.एका आयपीएस अधिकाऱ्यांनी नाव न सांगता ही माहिती दिली. आपण सावध राहावे असाही सल्ला त्या आयपीएस अधिकाऱ्यानं दिला आहे. अशी खुद्द माहिती देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलताना दिली आहे.