इर्शाळवाडी दुर्घटनेतून सावरते आहे…

0

irshalwadi raigad news

राज्यस्तरीय यंत्रणा व मंत्रालयाशी बचाव-मदत कार्यासाठी नियोजनबध्द समन्वय

बचाव यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, माध्यमे व इतरांसाठी माहितीची बिनचूक उपलब्धता

वैद्यकिय, निवारा, भोजन सह इतर तात्पुरत्या सुविधांची गतीने पुर्तता

आपत्तीग्रस्त व पिडीत मुलांच्या व्यक्तींच्या मानसिक आधारासाठी प्रयत्न

आपत्तीग्रस्तांच्या कायम पुनर्वसनासाठी वेगवान अंमलबजावणी सुरु..

जिल्हाधिकारी यांच्यासह शासन यंत्रणेची सतत पराकाष्ठा

रायगड जिल्हा हा आपत्ती प्रवण जिल्हा असलयाने जिल्हाधिकारी या नात्याने साधारण्पणे मे पासूनच तयारी सुरु केली. जून महिना संपताच जुलै महिन्यात कोकणात पावसाने बऱ्यापैकी जोर धरला… अन् पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्वतोपरी सज्ज करण्यात आली होती. जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसाळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा अलर्ट राहावी, यासाठी रात्री ११ मध्यरात्री दीड व पहाटे साडेचार यावेळेत दूरदृष्य प्रणाली द्वारे बैठकांचे आयोजन जिल्हाधिकरी यांनी केले होते. यामुळे या काळात संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर होती. याचकाळात १९ जुलैच्या रात्री इर्शाळगडच्या पायथ्याशी डोंगराच्या कुशीत वसलेल्या आदीवासी ठाकूरवाडीवर आघात झाला. राज्याच्या आपत्ती निवारण कक्षापासून… जिल्हा, तालुक्यातील प्रशासन… डोंगराच्या खाली असलेल्या ग्रामपंचायत चौक मधील गावपातळीवरील यंत्रणेपर्यत सतर्क होऊन बचावासाठी धाव घेतली. स्वत: जिल्हाधिकारी दुर्घटनावर स्थळी रात्रीच पोहाचले.

· कोसळत्या पावसात बचाव व मदत कार्याने घेतला वेग-

दरड कोसळल्यानंतर अवघ्या तासातच थेट घटनास्थळा जवळ प्रशासनाने सुरु केलेल्या नियंत्रण कक्षामुळे दुर्घटनेनंतर विविध मदत पथके घटनास्थळाजवळ पोहचू शकली होती. अगदी सकाळीच 8 ॲम्बुलन्स, पनवेल महानगरपालिका येथून 2 जेसीबी, पहाटे चार वाजता एनडिआरएफची दोन पथके, 44 अधिकारी कर्मचारी, नवी मुंबई येथून अग्निशमन दलाची यंत्रणा, कर्जत, कळम, आंबिवली, मोहिल आदी प्राथमिक आरोग्यकेंद्रांचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी घटनास्थळी आहे.

डोंगराच्या वरच्या भागात दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स हे देखील या मदतकार्यात सहभागी झाले आहेत. नंतर दिवसभरात एनडिआरएफची दोन पथके 150 मनुष्यबळासह इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, युवा मंडळे, ट्रेकर्स् ग्रपचे प्रतिनिधी असे दुपारनंतर जवळपास 700 जण मदत कार्यात सहभागी उपचारांसाठी शासकीय रुग्णालय तसेच एमजीएम हॉस्पिटल येथे बेड तयार ठेवण्यात आले. कोसळत्या मुसळधार पावसात बचाव कार्याने वेग घेतला व आपत्तीमधील आदिवासी पाड्याला थेट मदत हात मिळाला. पाणी बॉटल्स, ब्लॅंकेट्स, टॉर्च, मदतसाहित्य, चादरी, बिस्कीट तसेच इतर प्रथम उपचार साहित्य उपलब्ध होऊ शकले.

· राज्यस्तरीय यंत्रणेशी बचाव व मदत कार्यासाठी समन्वय-

रात्रीच जिल्हा प्रशासनाने इर्शाळवाडीच्या घटनेच्या गंभीरतेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रालयीन यंत्रणेपर्यंत पोहोचली. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने इसराळवाडी येथे येत असल्याचा संदेश आल्यानंतर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी पहाटेपासनच धाव घेत तातडीने भेट दिली. यामुळे आदीवासी पाडयाच्या दूर्गम ठिकाणी सकाळी मुख्यमंत्र्यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, बंदरे विकास व उत्ख्नन मंत्री दादाजी भुसे हे या ठिकाणी हजर झाले. शासकीय यंत्रणांबरोबर दुर्घटनास्थळी व्यक्ती, यंत्रणा सहभागी करून घेतली. ज्यामुळे रात्री शासकीय यंत्रणेसह अनेक स्वयंसेवी संस्था घटनास्थळी पोहोचून बचावकार्य वेगात सुरू झाले .

जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने पोलिस, आरोग्य, एनडीआरएफ, अग्निशमन दल, पनवेल, खोपोली या जवळच्या प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, आपत्कालीन विभागांसह शासकिय अधिकारी कर्मचारी, याभागातील स्वयंसेवक- ट्रेकर्स मदतीसाठी कमी कालावधीत पोहोचले. बळावर २० जुलै रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाड्यातील बचावलेल्या एकूण 98 जणांपर्यत पोहाचून सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. ५ गंभीर जखमींवर ॲडमिट करुन पनवेल एमजीएम रुग्णालयात उपचार याचा सर्व खर्च शासन करत आहे, तर काहीं किरकोळ दुखापत झालेल्या व्यक्तींना घटनास्थळी प्रथमोपचार करण्यात आले आहेत. दरड कोसळल्यानंतर आदिवासी कुटुंबातील आपले आप्त दिसेनासे झाल्याने डोळ्य पाणी आणून त्यांची वाट पाहणाऱ्या नातेवाईकांना माहिती पूरवण्यासाठी मुसळधार पाऊस व जोरदार वारा झेलत बचाव व मदत कार्य राबवण्यात येत होते. पहिल्या दिवसभरात १६ मृत व्यक्ती बाहेर काढण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, विविध मंत्री महोदय यांच्यासह जिल्हाधिकारी व यंत्रणेतील अधिकारी कार्यरत होते. महिला व बालविकास मंत्री कु.तटकरे यांनी रात्रीपासूनच प्रशासनाच्या संपर्का राहून तसेच जखमींना रुग्णालयात जावून भेट घेत दिलासा दिला. नंतरच्या ४ दिवसात आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे देखील घटनास्थळी आले. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पुढील उपाययोजना होईपर्यंत धान्य, साखर, रॉकेल मोफत पुरवण्याची आदेश दिले. दुर्घटनेत पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दोन पथकांमार्फत कार्यवाही केली.

· आपत्तीग्रस्त व पिडीत मुलांच्या व्यक्तींच्या मानसिक आधारासाठी प्रयत्न-

जिल्हा प्रशासनाने यामध्ये संवेदनशील होत बचावलेल्या २२ अनाथ मुलाची पुढील शैक्षणिक व भविष्याची सुव्यवस्था करण्यास सुरवात केली. यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नढळ येथे दुर्घटनेतील पीडितांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वतीने यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पालकत्व स्विकारले. यासह अनेक स्वयंसेवी संस्थांनी देखील या मुलांसाठी पालकत्व स्विकारत असल्याचे प्रशासनास संपर्क साधून निश्चित केल्याने त्यांचे भविष्यातील जिवन सावरण्यास नक्की मदत होईल.

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय रायगड अलिबाग च्या पथकाने इर्शाळवाडी येथील दरडग्रस्त जखमी व्यक्तींना ग्रामीण रुग्णालय चौक येथे जाऊन त्यांचे मनोबल वाढविले तसेच त्यांना भविष्यात ताकदीने उभे राहण्यासाठी समुपदेशन केले.

बचाव यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, माध्यमे व इतरांसाठी माहितीची बिनचूक उपलब्धता याचा सकारात्मक परीणाम बचाव व मदत कार्यावर झाला. मदत कार्यात गुंतलेल्या लोकांचे मनोबल उंचावले. या सर्व कामातून हे मदत कार्य अविरत सुरु राहील दुर्घटनाग्रस्त पाड्यावरील शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचण्यासाठी.

· जिल्हाधिकारी यांच्यासह शासन यंत्रणेची सतत चार दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा-

मागील काही वर्षांचा अनुभव पाहता उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संपर्क यंत्रणा बाधित झाली होती. मात्र यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने याची पुरेपूर खबरदारी घेतली. पोलीस विभागाची वायरलेस यंत्रणा, हॅम रेडिओच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, संबंधित तहसिलदार कार्यालयांमध्ये संपर्क व्यवस्था अबाधित राखण्याचे नियोजन करण्यात आले आहे. माथेरान, रायगड किल्ला, महाड गणेश टेकडी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रिपीटर स्टेशन उभारण्यात येत असून महाड उपविभागामध्ये वायरलेस कम्युनिकेशन यंत्रणा उभारण्यात आली आहे. याचा उपयोग आपत्तीला सामोरे जाण्यात झाला. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी जीवन पाटील, उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नेराळे, तहसिलदार खालापूर अयुब तांबोळी, मुख्याधिकारी खालापूर, पोलिस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक याबरोबर जिल्हा प्रशासनातील विविध जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांची, विविध स्वयंसेवी संस्थांतील सह्रदयी शेकडो जणांची भक्कम साथ लाभल्याचे दिसून आले.

· आपत्तीग्रस्तांच्या कायम पुनर्वसनासाठी वेगवान अंमलबजावणी सुरु….

मुख्यमंत्र्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुबियांना रु. 5 लाखांची मदत घोषित केली. त्यांचे शासकीय जमिनीवर कायमस्वरूपी पक्के घर बांधून देऊन पुनर्वसन करण्यात येणार आहे, मदत साहित्य व निवाऱ्यासाठी घटनास्थळाच्या बेसकॅम्पकडे उरण, जेएनपीटी, रत्नागिरी एमआयडीसी, जेएसडब्लू समूह येथून कंटेनर तातडीने आणण्यात आले आहे. यातून चौक खालापूर येथील जागेत 20 X 10 आकाराचे तसेच 40 X 10 आकाराचे 32 कंटेनर सज्ज करण्यात आले आहेत. याठिकाणी 20 शौचालये, 20 बाथरुम सुविधा संपन्न तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था प्रशासनाने केली व 43 कुटुंबातील 229 लोकांपैकी बचावलेल्या १४४ आदिवासी बांधवाना स्थानांतरीत केले.

मुख्यमंत्र्यांचा दौऱ्यातून सरकारच्या तातडीच्या हालचालींमुळे बचाव व मदत कार्यासाठी पुढे येणारे असे ज्ञात-अज्ञात अनेक हात, शासकिय विभागांची कार्यवाही आदिवासी पाड्याला पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी मदत व पुनर्वसन कार्याने वेग घेतला आहे.

या दुर्गम पाड्यावरील आदिवासींना आपत्तीमध्ये तुम्ही एकटे नाही तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असा दिलासा दिला आहे.

– जिल्हा माहिती कार्यालय, रायगड अलिबाग