जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी जळगाव मधील ओमकारेश्वर महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. अचानकपणे जशोदाबेन ओमकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी आल्याने भाविकांनीही आश्चर्य व्यक्त केले.
जळगाववरून जात असताना जशोदाबेन ह्या ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. दरम्यान यावेळी मंदिर विश्वस्तांच्या वतीने जशोदाबेन यांचे स्वागत करण्यात आले, दर्शनानंतर जशोदाबेन पुढील प्रवासासाठी रवाना झाल्या.