जातो माघारी पंढरीनाथा … दर्शन झाले आता

0

वारकरी निघाले परतीच्या प्रवासाला

(Pandharpur)पंढरपूर – जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर पर राज्यातून सुद्धा लाखो भाविक पंढरी नगरीमध्ये दाखल झाले होते. पंढरीची वारी पूर्ण करून वारकरी आणि भाविक भक्त आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.

मजल दरमजल करत टाळ मृदंगाच्या गजरात आणि हरी नामाचा जयघोष करत पायी प्रवास करत लाखो भाविक वारकरी भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीमध्ये दाखल झाले होते. चंद्रभागेचे स्नान करून पुंडलिकाचे दर्शन करून परब्रम्ह पांडुरंगाला डोळे भरून पाहिले. पांडुरंगाची मूर्ती हृदयामध्ये साठवून वर्षभराची नवीन ऊर्जा घेऊन हे वारकरी भाविक भक्त पंढरीतून आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.