SHARAD PAWAR शरद पवारांनी पालकमंत्र्यांचेही वाटप केले होते: सुधीर मुनगंटीवार

0

 

(Mumbai)मुंबई: (BJP)भाजप आणि (NCP)राष्ट्रवादी काँग्रेसची युती निश्चित झाली होती. मात्र (Sharad Pawar)शरद पवार यांनी आम्हाला धोका दिला हे (Devendra Fadnavis)देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य अगदी खरे आहे. शरद पवार यांनी पालकमंत्री आणि जिल्हे यांचेही वाटप केले होते. मात्र ते नंतर माघारी फिरले. शरद पवार यांनी डबलगेम केला हे फडणवीस यांचे म्हणणे अगदी खरे आहे, अशी प्रतिक्रिया (State Forest Minister Sudhir Mungantiwar)राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात दिली. शरद पवारांना त्या गोष्टीची पूर्ण कल्पना होती, असेही ते म्हणाले. (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह आघाडी करतील असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. आम्ही एकत्र लढलो होतो. पक्षाने मन मोठं केले व त्यांना जागा दिल्या होत्या. पण तेव्हाही बेईमानी झाली. आम्ही आमच्या पक्षातून त्यांना उमेदवारही दिला होता. साताऱ्यातील भाजपाचा उमेदवार हा (Shiv Sena)शिवसेनेचा म्हणून दिला होता. कुठल्याही राजकीय पक्षात असे घडत नाही; पण आम्ही ते केले होते, असेही मुनगंटीवार म्हणाले.