जयंत पाटलांचे ‘ते’ वक्तव्य आणि आता सारवासारव

0

मुंबईः पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांनी केलेली खेळी असू शकते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे अनेक तर्क वितर्क (NCP Leader Jayant Patil) लावण्यात येत आहेत. या विधानापायी आपली कोंडी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सारवासारव सुरु केलीय. शरद पवार यांची खेळी, हे असे बोललोच नाही तर आपण तसा अंदाज लावला, असे ते म्हणाले. त्यावेळचा घटनाक्रम पाहता घटनाक्रमाचा फायदा राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी होता. त्यामुळे पवार साहेबांनी ते जाणून बुजून केले, असे म्हणता येत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळ आजही चर्चेचा विषय आहे. त्यावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी ‘राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्यामुळे शरद पवारांची ती खेळी असू शकते, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून त्यामुळे पाटील यांच्यावर सारवासारव करण्याची पाळी आलीय. राष्ट्रवादी फुटली नाही, शिवसेनेचेच आमदार सोडून गेले. राष्ट्रवादीने शेवटपर्यंत शिवेसनेला साथ दिली हे नाकारता येणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले. शरद पवार यांची खेळी, हे असे बोललोच नाही तर आपण तसा अंदाज लावला, अशी सारवासारव त्यांनी केली.

 

पनीर चिंगारी आणि ब्रेड पकोडा Ep.no 77 | Paneer Chingari & Bread Pakoda | Shankhnaad khadyayatra