अमरावती – कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता उलथून टाकत काँग्रेसने एका हाती सत्ता मिळवली. या विजयानंतर अमरावतीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोल ताशाच्या गजरात काँग्रेस नेत्यांनी चांगलाच ठेका धरला. चौकामध्ये जल्लोष करण्यात आला. यावेळेस काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तोडफोडीचे राजकारण जनतेने भाजपला नाकारले -यशोमती ठाकूर
अमरावती : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या वेळी ज्या पद्धतीने हॉर्स ट्रेडिंग केली. मोठ्या प्रमाणात कर्नाटकात भ्रष्टाचार केला व जातीपातीचे राजकारण केलं त्याचीच ही चपराक भाजपला मिळाली असल्याचे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी मराठीबहुल असलेल्या सीमा वर्ती भागात जाऊन प्रचार केला मात्र त्यांनाही जनतेने नाकारलं हीच परिस्थिती महाराष्ट्रात होईल. ऑपरेशन लोटसच्या विरोधातील हा कल आहे. भाजप आणि भाजप सोबत असणाऱ्या संघटना त्या फक्त वादविवाद करण्यात माहिर आहेत. हा सगळ्यांचा अनुभव आहे.
जातीभेद मध्ये आणुन काही तरी विचित्र बोलतात. हिंदु-मुस्लिम भेद कसा झाला पाहिजे याकडे ते बघत असतात. कर्नाटक मध्ये कॉंग्रेस आपलं सरकार नक्कीच बनवेल.भाजपला तोडफोडीचे राजकारण व भ्रष्टाचारामुळे जनतेने नाकारले.अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.