NAGPUR नागपूर : विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एस.बी. गावंडे यांनी शुक्रवारी बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणातील तीन आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.Three accused in the much talked about Kamble double murder case were sentenced to double life imprisonment एक अल्पवयीन आरोपीला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. गणेश शिवभरण शाहू हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. इतर आरोपींमध्ये गणेशची पत्नी गुडिया ऊर्फ गुड्डी व भाऊ अंकित यांचा समावेश आहे. या तिघांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ते सर्व पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. उषा कांबळे व राशी कांबळे, अशी मृतांची नावे होती. ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली. त्यादिवशी आरोपी गणेश व उषा कांबळे यांच्यामध्ये भिसीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीडवर्षीय राशीचाही निर्घृण खून केला आणि त्यांचे मृतदेह उमरेड रोडवरील विहीरगावजवळच्या नाल्यात फेकून दिले. सरकारच्या वतीने विशेष वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. फिर्यादी रविकांत कांबळे यांचे वकील ॲड. समीर सोनवणे यांनी त्यांना सहकार्य केले.On behalf of the Government, Special Advocate Adv. Ujjwal Nikam argued the case. Counsel for plaintiff Ravikant Kamble Adv. Sameer Sonawane assisted him.
काय आहे प्रकरण?
17 फेब्रुवारी 2018 रोजी संध्याकाळपासून आजी-नात बेपत्ता होत्या, त्यानंतर रविवारी (18 फेब्रुवारी 2018) त्यांचे मृतदेह नागपूर-उमरेड रस्त्याजवळ नाल्यात एका गोणीत गुंडाळलेले सापडले होते. बेपत्ता होण्यापूर्वी उषा कांबळे या राशीला घेऊन घराजवळच्या ज्वेलर्सकडे पायपट्टी घेण्यासाठी गेल्या होत्या. परत येताना शिव किराणा स्टोअर्सजवळ त्या काही वेळ थांबल्या होत्या. मात्र त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरीच न परतल्यामुळे कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
त्यानंतर 18 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी दोघींचे मृतदेह घरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर एका नाल्यात आढळले होते. या घटनेचे धागेदोरे पोलिसांना कांबळे कुटुंब राहत असलेल्या पवनपुत्रनगर परिसरात मिळाले. पोलिसांना कांबळे कुटुंबियांच्या घरापासून 100 मीटर अंतरावर शिव किराणा स्टोअर्स अँन्ड डेली नीड्सच्या समोर उभ्या असलेली महिंद्रा xuv गाडी संशयास्पदरित्या धुतलेली आढळली. पोलिसांनी चौकशी केली असता कारमध्ये पोलिसांना काही रक्ताचे डाग मिळाले. पोलिसांनी किराणा दुकानचा मालक गणेश शाहूला ताब्यात घेत विचारपूस करायला सुरुवात केली.
गणेशच्या घराच्या वरच्या मजल्यावर अनेक ठिकाणी रक्ताचे डाग आढळले. इतकंच नाही, तर किचनमधील बेसिन आणि बाथरुमच्या नळाजवळही रक्ताचे डाग आढळले. छतावरच्या पंख्याच्या एका पात्यावरही रक्ताचे डाग आढळले. तसेच परिसरातील काही लोकांनी शनिवारी संध्याकाळी उषा कांबळे यांना शिव किराणा स्टोअर्सजवळ पाहिलं होतं. अखेर पोलिसी खाक्या दाखवला आणि गणेश साहूने हत्येची कबुली दिली. आर्थिक वादातून आपण या दोघींची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.














