
बुलढाणा – टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे शहरी भागात ओरड सुरु झाली आणि सरकारने भाव नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पण जेव्हा टोमॅटोचे भाव पडून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर होता, भरल्या शेतात बकऱ्या सोडत होता तेव्हा सरकारला जाग का आली नाही? तेव्हा सरकारने भाव वाढविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.