मुंबई MUMBAI -तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर Chief Minister KCR यांच्या प्रयत्नांचा MAHARASHTRA महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीच परिणाम होणार नाही. झालाच तर तो तेलंगणमध्ये होईल. केसीआर BJP भाजपचे काम करीत असून ते तेलंगणमध्येच हरतील, असा दावा ठाकरे गटाचे खासदार SANJAY RAUT संजय राऊत यांनी केलाय. केसीआर अशीच नौटंकी करीत राहिले तर तेलंगणमध्येच हरतील. केसीआर भाजपचे काम करतायत. ते भाजपची बी टीम आहेत. भाजपने जसे ओवेसींना पाठवले होते, तसेच केसीआर यांनागी पाठवले आहे. त्याचा परिणाम त्यांना तेलंगणमध्ये भोगावा लागेल. महाराष्ट्रात Mahavikas Aghadi महाविकास आघाडी मजबूत आहे, असेही ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, तेलंगणधील पराभवाच्या भीतीने ते महाराष्ट्रात घुसत आहेत. ताफा घेऊन येत आहेत. पण दुसरीकडे तेलंगणमध्ये त्यांचा पक्ष फुटला आहे. १२ ते १३ माजी आमदार काँग्रेसमध्ये गेलेत. ही लढाई काँग्रेस आणि केसीआर यांच्यातील आहे. त्यांनी दोघांनी बसून तो वाद सोडवला पाहिजे. तेलंगणमध्ये जे चाललंय, त्याचा बदला ते महाराष्ट्रात घेत आहेत, असे राऊत म्हणाले. ‘केसीआर हे लढवय्ये नेते आहेत. लढणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. ते भाजपला शरण का जातायत? एवढ्या वर्षात ते कधी पंढरपूरमध्ये दिसले नाहीत. त्यांना विठ्ठल दर्शन करावेसे वाटलं नाही. मग आता अचानक विठ्ठलभक्त कसे झाले? ताफा घेऊन तुम्हाला देवाने बोलावले का? पैशाच्या जोरावर काही लोकांना त्यांनी गळाला लावले आहे. जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पण त्याचा काही परिणाम होणार नाही, असे राऊत म्हणाले.