भोपाळ Bhopal -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत सुतोवाच केले. (PM Narendra Modi on Uniform Civil Code) देशातील मुस्लिम समाज राजकारणाचा शिकार होत असल्याचे मत व्यक्त करून मोदी यांनी एका घरात राहणाऱ्या भावडांसाठी वेगवेगळे कायदे अस्तित्वात राहिल्यास ते घर टिकेल का? असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांवरही निशाणा साधला. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी पाच Vande Bharat Express वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना हिरवा कंदील दाखवला. यानंतर त्यांनी मेरा बूथ-सबसे मजबूत या कार्यक्रमास संबोधित करताना समान नागरी कायद्यावर भाष्य केले.Prime Minister Modi’s promise to implement the Uniform Civil Code
समान नागरी कायद्याचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, या कायद्याबद्दल (Uniform Civil Code) लोक अफवा पसरवित आहेत. एका कुटुंबामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम असतील, तर ते कुटुंब पुढे कसे जाईल? देशात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करत आहे. मात्र, व्होट बँकसाठी काही लोक या कायद्याला विरोध करत आहेत. देशातील मुस्लिम बांधवांचा काही लोक राजकारणासाठी वापर करून घेत आहेत. राजकीय पक्ष मुस्लिम समाजाला भडकावून आपला फायदा करून घेत आहेत व देशातील मुस्लिमांनी लक्षात घ्यायला हवे. या राजकारणामुळेच त्यांचे मोठे नुकसान होत आहे. तीन तलाक हा नियम मुस्लिम मुलींसाठी अन्यायकारक होता. जे लोक याचे समर्थन करतात, ते केवळ मतांचे भुकेले आहेत. तीन तलाक संपूर्ण कुटुंबाला उध्वस्त करते. मी नुकताच इजिप्त दौऱ्यावर होतो. त्या देशाने सुमारे ८०-९० वर्षांपूर्वीच ‘ट्रिपल तलाक’ रद्द केला. यासोबतच कतार, इंडोनेशिया, बांगलादेश अशा मुस्लिम बहुल देशांमध्येही ‘ट्रिपल तलाक’ बंद करण्यात आला आहे, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले.