दिवसाढवळ्या तरुणाची हत्या

0

(Nagpur) नागपूर -प्रेम प्रकरणातून एका तरुणाची चार ते पाच हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या हत्या केल्याची घटना आज दुपारी नागपुरातील रिपब्लिकन नगर परिसरातील श्रावस्ती नगर बौद्ध विहरजवळ घडली. (Shreyansh Shailesh Patil)श्रेयांश शैलेश पाटील असे या मृतकाचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या घटनेत 31 वर्षीय श्रेयांश एका कपड्याचे दुकानात काम करीत होता. या युवकाचे एका मुलीशी प्रेम संबंध होते. प्रेम संबंधाला विरोध असणाऱ्यानी एकत्रित संगनमत करून हे हत्याकांड घडवून आणल्याची प्राथमिक माहिती आहे.