(Nagpur)नागपूर : नागपूर येथील शिक्षण विभागात शिक्षकांच्या समस्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. येथील अधिकारी, कर्मचारी कामानिमित्त येणाऱ्या शिक्षकांना योग्य वागणूक देत नाही, कामांत अनेक अनियमितता असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी यासर्व विषयांवरुन शिक्षणाधिकाऱ्यांचा क्लास घेतला.
नागपूर विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी (MLA Sudhakar Adbale)आमदार सुधाकर अडबाले यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या ‘समस्या तुमच्या पुढाकार आमचा’ या ‘विमाशि संघा’च्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांच्या समस्या निवारणासाठी नागपूर जिल्हा परिषदेतील कै. खेडेकर सभागृहात समस्या निवारण सभा बुधवारी (ता. २८) पार पडली. विशेष म्हणजे, ही समस्या निवारण सभा तब्बल साडेसहा तास चालली.
या समस्या निवारण सभेत टप्पा अनुदान वाढबाबत चर्चा करणे, वन हेड वन व्हाउचर योजना नागपूर जिल्ह्यात कार्यान्वित करणे, प्रलंबित वैद्यकीय देयके, वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी फरकाची देयके, जीपीएफ परतावा/ ना परतावा देयके, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रदान देयके, कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तिका देणे, प्रलंबित वरिष्ठ / निवड श्रेणी बाबत चर्चा करणे, वेतन दरमहा एक तारखेला अदा करणे, जीपीएफ/एनपीएस पावत्या वितरणाची सध्यस्थिती, सहाव्या – सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सेवानिवृत्त प्रस्ताव, सेवानिवृत्ती उपदान बाबत चर्चा करणे, प्रलंबित मुख्याध्यापक, उपमुख्यध्यापक व पर्यवेक्षक पदोन्नती प्रस्ताव, अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन व इतर अनेक विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. सोबतच प्राथमिक व माध्यमिक विभागातील अनेक वैयक्तिक प्रकरणांवर चर्चा करून वैयक्तिक व सामूहिक प्रकरणे ३० जुलैच्या आत निकाली काढण्याचे शिक्षण विभागास आमदार सुधाकर अडबाले यांनी आदेश दिले. व एका महिन्यानंतर याच विषयावर आढावा बैठक घेणार असल्याचे आमदार अडबाले यांनी निर्देश दिले.
उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची पदोन्नती, सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते, वैद्यकीय देयके, वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी प्रस्ताव, अनुकंपा तत्त्वावरील
प्रकरणे, जीपीएफ/एनपीएस पावत्या व इतर प्राथमिक व माध्यमिक विभागातील अनेक प्रकरणांत बऱ्याच अनियमितता असल्याचे आढळून आल्याने आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच सभेस अनुपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अश्या सूचनाही आमदार अडबाले यांनी दिल्या.
सभेत वरिष्ठ श्रेणी मान्यता पूर्वीप्रमाणे लेखाधिकारी (शिक्षण) यांच्याकडे पाठविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वस्त केले. माध्यमिक विभागातील जास्त समस्या प्रलंबित असल्याने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) (Ravindra Katolkar)रवींद्र काटोलकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे मान्य केले.
यावेळी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव, शिक्षणाधिकारी (माध्य.) रवींद्र काटोलकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) (Rohini Kumbhar)रोहिणी कुंभार, पे युनिट अधीक्षक जिभकाटे,(Nilesh Waghmare) निलेश वाघमारे, (Sushil Bansod)सुशील बनसोड, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष (Shravana Barde)श्रावण बरडे, (Vice President Ramesh Kakade)उपाध्यक्ष रमेश काकडे, (General Secretary of Wijukta Dr. Ashok Gavankar)विज्युक्ताचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, विमाशिचे (Avinash Badhe)अविनाश बढे, जिल्हाध्यक्ष (शहर) (Vitthal Junghari)विठ्ठल जुनघरी, जिल्हाध्यक्ष (ग्रा.) (Anil Gotmare)अनिल गोतमारे, (District Officer Sanjay Warkar)जिल्हा कार्यवाह संजय वारकर, (Dhanraj Raut)धनराज राऊत, (Bhushan Talhar)भूषण तल्हार, (Mangesh Ghavghwe)मंगेश घवघवे, विश्वास गोतमारे, लक्ष्मीकांत व्होरा, गोमकर, दिलीप बोके, राजेश धुंदाड, दिलीप बांबल, प्रमोद अंधारे, शैलेश येडके, जुनी पेन्शन संघटनेचे आशुतोष चौधरी, सचिन इंगोले व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विमाशी संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.