(Pandharpur)पंढरपूर– आषाढी एकादशीनिमित्त (Chief Minister Eknath Shinde)(मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटेच सपत्नीक विठुरायाची महापूजा केली. सलग दुसऱ्या वर्षी सहकुटुंब विठूरायची शासकीय पूजा करण्याचे भाग्य मला मिळाले.बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, सगळी संकट, अरिष्ट दूर होऊ दे, चांगला पाऊस पडू दे याशिवाय दुसरं काय मागणार? सगळे शेतकरी, कामगार, कष्टकरी, धारकरी यांना चांगले समृद्धीचे जीवन मिळू दे हेच मागणं मागितल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
आषाढी वारीला लाखो वारकरी पायी दिंडीने चालत येतात, संपूर्ण पंढरपूर पांडुरंगमय झालय,वारकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी सर्व प्रशासन, मंत्री हे काम करत आहेत.पूजा सुरु असताना मुखदर्शन एक मिनिटही बंद ठेवलं नाही .मागच्यावर्षी मुख्यमंत्री झाल्यावर लगेचच आलो होतो. वर्षभरात बरंच पाणी गेलं, पण सगळं सुरळीत होतंय. महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्यातल्या सर्व लोकांना लागू करणारे हे पहिलं सरकार आहे. गेल्या अडीच वर्षात जी काम थांबली होती ती पूर्ण करण्याचे काम आम्ही करत आहोत विकास आराखड्याचं काम सर्वांना विश्वासात घेऊन केलं जाईल, त्यामुळे काही चिंता करु नका असेही आश्वासन दिले.