(Pandharpur)पंढरपूर – (Ashadhi Ekadashi )आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात सुमारे दहा लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहे. संपूर्ण पंढरी नगरी विठ्ठलमय झाली आहे. पहाटे विठूरायाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाली आणि एकादशीच्या सोहळ्यात सुरुवात झाली. (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बळीराजा सुखी होऊ दे, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात समृद्धीचा दिवस येऊ दे असे साकडे विठ्ठल चरणी घातले. पहाटे अडीच वाजता विठ्ठल मंदिरामध्ये विठुरायाची शासकीय महापूजा सुरू झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील (Bhausaheb Kale)भाऊसाहेब काळे या दांपत्यास मानाचा वारकरी म्हणून महापूजेचा बहुमान मिळाला. विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या महापूजेनंतर एकादशीच्या सोहळ्यास सुरुवात झाली. यावेळी पहाटेपासूनच चंद्रभागा स्नानासाठी वारकरी भक्तांनी गर्दी केली. नगर प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या संख्येने भाविक पहाटे पासूनच दिंड्या घेऊन निघाले होते. भगव्या पताका , भजनी ठेका आणि मुखी विठ्ठल विठ्ठल नाम अशा घोषात सारी पंढरी नगरी दुमदुमलेली दिसून आली.